आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती समजून घेऊया ayushyaman bharat yojana
आयुष्यमान भारत योजना या योजनेविषयी आपण आज समजून घेणार आहोत आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरावर राबवली जाते केंद्र शासन या योजनेला पूर्ण देशांमध्ये राबवते यामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे या योजनेचे नाव आहे.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व सर्व भारतीयांना मोफत आरोग्य विमा दिला जातो.
केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकांच्या हितासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यामधीलच एक म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना होय. केंद्र सरकार द्वारे ही योजना राबवली जाते भारतातील शासकीय व प्रायव्हेट क्षेत्रातील दवाखान्यांमध्ये नागरिकांच्या उपचारासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याद्वारे विविध इलाजासाठी मोफत आरोग्य विमा दिला जातो या योजनेअंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांना लाभ दिला जातो.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ayushyaman bharat yojanaआयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती तयार करण्यात आलेले आहेत त्या अटी व शर्तीचे पालन करणाऱ्या कुटुंबांना सदस्यांना या योजनेअंतर्गत मोठा लाभ दिला जातो केंद्र सरकार राबवित असलेली ही योजना सर्व देशांमध्ये राबवली जाते तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

आयुष्यमान भारत योजनेसाठी कार्ड
सदर योजनेमध्ये कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येक वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत विमा दिला जातो आयुष्यमान भारत योजनेचा लाभासाठी पात्र असणाऱ्या लोकांना आधार कार्ड द्वारे केवायसी करून आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवले जाते हे कार्ड बनवण्यासाठी आधार कार्डचा उपयोग केला जातो आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आरोग्य मित्राच्या मदतीने आपण आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकता.
आयुष्यमान भारत योजना ऑनलाइन अर्ज
आयुष्यमान भारत योजनेसाठी ayushyaman bharat yojanaऑनलाईन अर्ज कसा करावा यासंबंधी सर्व खालील प्रमाणे आहेत
- सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा
- पुढे तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक टाकून कॅपच्या कोड इन्सर्ट करा
- तुमच्या अधिकृत फोन नंबर वर ओटीपी येईल तो भरा
- त्यानंतर मोबाईलवर नवीन पेज open होईल
- त्यानंतर तुमचे राज्य सिलेक्ट करा
- पुढे आपली पात्रता तपासण्यासाठी फोन क्रमांक संपूर्ण नाव राशन कार्ड चा नंबर टाका
देशातील जे गरीब कुटुंब आहेत आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत अशा कुटुंबांसाठी ही योजना वरदान ठरत आहे केंद्र शासनाकडून ही योजना राबवली जाते देशांमधील असंख्य लोकांना या योजनेचा फायदा होत आहे या योजनेमध्ये ते सहभागी होत आहेत या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना पाच लाखापर्यंतचा मोफत विमा दिला जात आहे केंद्र शासनाने 2018 पासून या योजनेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती या योजनेअंतर्गत तुम्हाला एक कार्ड दिले जाते जे कार्ड तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
आयुष्यमान भारत योजना गोल्डन कार्ड
आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेसाठी गोल्डन कार्ड आवश्यक असणार आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आयुष्यमान भारत योजना ही एक जनसामान्यांसाठी आरोग्यदायी योजना आहे यामध्ये विमा दिला जातो पाच लाखापर्यंत मोफत उपचार केला जातो.
या योजनेसाठी आवश्यक पात्रता
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे
आयुष्यमान भारत योजना फायदे खालील प्रमाणे आहेत
- कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाच लाखाचा विमा मोफत कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसठी पाच लाखांचा सदर योजनेत अंतर्गत मोफत करण्यात आलेला आहे खाजगी किंवा सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत इलाज होणार आहेत यामध्ये सर्व खर्च केंद्रशासन भरणार आहे
- पुरुष महिला तसेच वयस्कर व्यक्तींना याचा जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे
- सर्व आजारांवरती विमा संरक्षण कवच
- कॅशलेस तसेच पेपरलेस विमा संरक्षण योजना
- सर्व नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने निरोगी बनवणे
- मोफत आरोग्य योजना
- सर्व कुटुंब धारकांना मिळणार लाभ
- वयस्कर व्यक्तींना विशेष लाभ देण्यात येतो
- रुग्णालयांमध्ये रुग्णास दाखल होण्यापूर्वी तसेच दाखल केल्यानंतरचा खर्च संपूर्णतः मोफत
-
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा